राज्यभरात नव वर्षाच्या स्वागतापूर्वी चालू वर्षाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. अशातच ३१ डिसेंबर कसा साजरा करायचा याचे प्लान देखील सुरू झाले आहेत. मात्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने भारतातही मास्क सक्तीचे करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचे सावट आहे, असे असले तरी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नव वर्ष धुमधडाक्यात साजरं करा, असे म्हटले आहे. देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मंदिरात मास्कसक्ती केली आहे.
(हेही वाचा – राज्यातील सर्वच महापालिकांमधील कामकाज ठप्प! बांधकाम परवाने देणारी ‘ही’ वेबसाईट बंद)
कोरोनाचे संकट बघता यंदाच्या ३१ डिसेंबरवर निर्बंध येणार का, अशी चिंता आणि चर्चा होती. मात्र पुण्यात ३१ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत रेस्टॉरंट आणि बार सुरू राहणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेस्टॉरंट आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत तर वाईन, बिअर आणि देशी मद्य विक्रीची दुकाने रात्री साडे १० ऐवजी रात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
दरम्यान, कोरोनाला महाराष्ट्राती नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. आपल्याला धोका पत्कारायचा नाही, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. तुम्हीही कोरोना नियमांचे पालन करत वर्षाअखेर आणि नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करत साजरा करा, असे आवाहनच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनची चिंता काहिशी कमी झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मॉकड्रील करत खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे यंदाचे नववर्ष नागरिकांना जल्लोषात साजरं करायला मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community