३१ डिसेंबरला पश्चिम रेल्वेकडून विशेष सुविधा! रात्री लोकलच्या ८ विशेष फेऱ्या, पहा वेळापत्रक

125

नववर्ष साजरे करण्यासाठी अनेक नागरिक रात्री उशिरा घराबाहेर पडतात. उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार दरम्यान ८ लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : बेस्टच्या टेबल टेनिस स्पर्धेमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाची सरशी! )

पश्चिम रेल्वेचे विशेष नियोजन 

मरिन लाईन्स, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी या भागात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. तसेच या दरम्यान देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने मुंबई दर्शन करण्यासाठी येतात. नववर्ष जल्लोषात साजरे केल्यानंतर रात्रीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रात्री लोकल फेऱ्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

३१ डिसेंबर ते १ जानेवारी २०२३ नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल गाड्या

चर्चगेट ते विरार – रात्री १.१५ वाजता
चर्चगेट ते विरार – रात्री २.०० वाजता
चर्चगेट ते विरार – रात्री २.३० वाजता
चर्चगेट ते विरार – रात्री ३.२५ वाजता

विरार ते चर्चगेट – रात्री १२.१५ वाजता
विरार ते चर्चगेट – रात्री १२.४५ वाजता
विरार ते चर्चगेट – रात्री १.४० वाजता
विरार ते चर्चगेट – रात्री ३.०५ वाजता

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.