Income Tax भरणाऱ्यांना मोठा दिलासा! आयकरमध्ये मिळणार सूट? नवा आदेश जारी

151

कर प्रणालीतील आयकर अर्थात इन्कम टॅक्स हा सर्वांसाठी महत्त्वाचा कर आहे. मध्यमवर्गापासून उच्च वर्गापर्यंत सर्वांचा या कराशी संबंध येत असतो, मात्र आता सरकार आयकर भरणाऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. कारण नुकताच करदात्यांना सूट देऊन मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त मंत्रालयाकडून यासंदर्भातील नवा आदेश जारी करण्यात आला आहे.

या रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही

आयकर विभागाकडून नुकताच करदात्यांना दिलासा देताना करामध्ये सवलीचा नवा आदेश जारी करण्यात आला आहे. या नव्या आदेशानुसार, आतापासून करदात्यांना उपचारासाठी मिळणाऱ्या रकमेवर लागणाऱ्या आयकरावर सवलतीचा फायदा मिळणार आहे. म्हणजेच आयकरात सूट मिळणार असून या रकमेवर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.

(हेही वाचा – शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यानं राऊतांना फटकारलं, ‘त्यांच्या लवंगी फटाक्याने कुत्रही पळत नाहीत, आम्ही तर…’)

CBDT कडून सूट देण्यासाठी फॉर्म जारी

आयकर विभाग करदात्यांच्या सुविधा लक्षात घेऊन वेळोवेळी नियमांमध्ये बदल करत असतो. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) यासंदर्भात माहिती दिली आहे. CBDT ने नुकतेच नवीन अटी आणि कोरोनाच्या उपचारांवर झालेल्या खर्चावर आयकर सवलतीसाठी एक फॉर्म जारी केला होता. 5 ऑगस्ट 2022 च्या अधिसूचनेनुसार, आतापासून तुम्हाला तुमच्या नियोक्त्याकडे काही कागदपत्रांसह एक फॉर्म आयकर विभागाकडे सबमिट करावा लागेल, ज्यामध्ये नियोक्ता किंवा नातेवाईकांकडून कोरोनावरील उपचारांसाठी मिळालेल्या रकमेवर कर सवलतीचा दावा केला जाऊ शकतो.

याशिवाय आयकर विभागाने लोकांच्या सुविधा लक्षात घेऊन आणि डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी करमाफीसाठी फॉर्मचे डिजिटल केले होते, जेणेकरून लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये आणि कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.