पुण्यातील वारजे जलकेंद्राच्या अखत्यारीतील गांधी भवन टाकीवरील कोथरूड परिसर आणि चांदणी चौक (चौकोनी) टाकीवरील बावधन परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या लाईनला फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी ( दि.२९) बंद ठेवण्यात येणार आहे. या सर्व भागाला शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
(हेही वाचा – Income Tax भरणाऱ्यांना मोठा दिलासा! आयकरमध्ये मिळणार सूट? नवा आदेश जारी)
‘या’ भागात पाणी पुरवठा असणार बंद
पुण्यातील वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकीवरील कोथरूड परिसर
महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, गणंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-1, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, डी. पी. रोड वरील भाग
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकीवरील बावधन परिसर
बावधन, गावठाण, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, वैदेही एनक्लेव्ह सोसा., विद्यान नगर, पाषाण रोड वरील डावा, उजवा भाग या ठिकाणी पाणी पुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे.
Join Our WhatsApp Community