सध्या राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे. आता ही यात्रा उत्तर प्रदेशमध्ये येणार आहे. त्याआधीच काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या वादग्रस्त वक्तव्याने ती पुन्हा वादात सापडली आहे. खुर्शीद यांनी जाणीवपूर्वक राहुल गांधी यांची तुलना भगवान श्री राम यांच्याशी केली. त्यामुळे भाजपाने जोरदार हल्लाबोल केला.
काय बरळले खुर्शीद?
भगवान श्रीरामाच्या आधी त्यांच्या ‘खडावा’ आधी जातात. कधी कधी श्रीराम यांना ज्या ठिकाणी पोहोचता येत नाही, तेव्हा भरत ‘खडावा’ घेऊन ठिकठिकाणी जातात. त्याप्रमाणे आम्ही ‘खडावा’ उत्तर प्रदेशामध्ये नेल्या आहेत. आता त्या ‘खडावा’ उत्तर प्रदेशामध्ये पोहचल्या आहेत, आता रामजी (राहुल गांधी) ही येतील, असे सलमान खुर्शीद म्हणाले.
अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांशी तुलना करा
त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून जोरदार टीका झाली. ट्विटरवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले की, खुर्शीद हे ‘परिवार भक्ती’साठी ‘भगवान भक्ती’ आणि ‘देशभक्ती’ बाजूला ठेवत आहेत. काँग्रेस नेते इतर धर्मांबद्दल असेच साधर्म्य दाखवू शकतात का आणि त्यांना केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांबाबत स्वातंत्र्य आहे का, असा आरोप केला.
Join Our WhatsApp Community