व्हिडीओकाॅनचे मालक आणि उद्योगपती वेणूगोपाल धूत यांना न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे. कोचर दाम्पत्य आणि धूत यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. अशात केंद्र आणि राज्यातील काही राजकीय नेते देखील सीबीआयच्या रडारवर असण्याची शक्यता आहे.
केंद्र आणि राज्यातील नेत्यांचे व्हिडीओकाॅन कनेक्शन तपासणार
CBI कडून वेणूगोपाल धूत यांना अटक झाली. आता आयसीआयसीआय बॅंक कर्ज घोटाळ्यासंबंधित अनेक नवे खुलासे होण्याचा अंदाज आहे. CBI कडून धूत यांचे राजकीय संबंधदेखील तपासले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ICICI बॅंक कर्ज प्रकरणातून पैसे काही राजकीय व्यक्तींना वळते झाल्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे ते कुठे वळते झाले याचा देखील तपास CBI करणार आहे.
( हेही वाचा: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन जण जागीच ठार,दोन गंभीर जखमी )
राजकीय पक्षांना पैसे दिले का? CBI करणार चौकशी
वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून मिळालेली रक्कम काही राजकीय नेत्यांकडे वळती झाली आहे का? याचा तपासदेखील सीबीआय करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच राजकीय पक्षांनादेखील पैसे वळते झालेत का? याचा देखील तपास होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Join Our WhatsApp Community