कर्नाटक मंत्र्यावर फडणवीस भडकले; म्हणाले, ‘मुंबई कोणाच्या बापाची…’

168

नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राने कर्नाटकविरोधात ठराव एकमताने मंजूर केला. दरम्यान, कर्नाटकच्या काही मंत्र्यांनी मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक, मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी केली. यामागणीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक मंत्र्यांवर चांगलाच निशाणा साधला. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांच्या निर्णयाचा विधानसभेत जोरदार निषेध करण्यात आला असून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यावेळी मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्या बापाची नाही, असे म्हणत फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.

(हेही वाचा – Assembly Winter Session: हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर, काय आहे हा कायदा?)

काय म्हणाले फडणवीस

मुंबई ही महाराष्ट्राची आहे. मुंबईवर जर कोणी दावा सांगत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत जे ठरलं आहे त्याचं उल्लंघन वारंवार कर्नाटक सरकारकडू होत आहे. त्याबद्दल आम्ही निषेध करतो. विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले आहे, त्याप्रमाणे तशा प्रकारचे निषेधाचे पत्र आम्ही त्यांना पाठवू. गृहमंत्र्यांसमोर जे ठरलं आहे, त्याचे उल्लंघन करणं दोन राज्यांतील संबंधांसाठी योग्य नाही. हे त्यांना अतिशय कडक शब्दांत सांगण्यात येईल. तसेच तुमच्यासमोर जे ठरलं होतं त्याचं कर्नाटक पालन करत नसल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून दिलं जाईल.

पुढे ते असेही म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्र्यांनीही कर्नाटकच्या अशा बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे, अशी विनंतीही करण्यात येईल. मी पुन्हा सांगतो की, मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही. त्यावरचा कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही. सरकार नव्हे तर सभागृह म्हणून निषेध असून या सभागृहाच्या भावना कर्नाटक सरकार, केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.