मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट! काय आहे प्रकरण?

122

राज्यातील राजकारणात अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद वारंवार त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात. मात्र आता त्यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदेंनी सय्यद यांच्यावर हे गंभीर आरोप केले असून त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आरोप केले आहेत. यासह दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होणारे व्यवहार चुकीचे आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. यानंतर दीपाली सय्यद यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

(हेही वाचा – Assembly Winter Session: हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर, काय आहे हा कायदा?)

पत्रकार परिषदेत काय म्हणाले भाऊसाहेब शिंदे

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले होते. पुरस्कारामध्ये 50 लोकांना 50 हजारांचे धनादेश देण्यात आले होते. पुरस्कारात देण्यात आलेले चेक बनावट असल्याचाही आरोप शिंदेंकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या ट्रस्टच्या माध्यमातून 700 ते 800 कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून हा पैसा चुकीच्या मार्गाने आला असून याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे. दीपाली सय्यद यांचे दाऊदसोबत संबंध असून याचे सर्व पुरावे देऊ, असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे.

… आणि सय्यद यांनी राज ठाकरेंना मारण्याचा कट रचला

पुढे ते असेही म्हणाले की, भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंग यांची भेट घेऊन दीपाली सय्यद यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट रचला होता. अयोध्या दौऱ्यात भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना सय्यद प्रोत्साहित करत होत्या, असा आरोपही त्यांच्यावर शिंदे यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.