Fact Check: तुम्ही BSNL ग्राहक आहात? पुढच्या २४ तासात तुमचं सिमकार्ड होणार बंद!

141

तुम्ही बीएसएनएल (BSNL) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्या आखत्यारितील भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) चा तोटा पाहता गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल सेवा बंद करण्याचा विचार सुरू आहे. अशातच पुढील २४ तासात बीएसएनएलचे सिमकार्ड बंद होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इतकेच नाही तर सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल विकणार असल्याचा दावा काही अहवालात केला जात आहे. यासह सिमकार्ड बंद करणार असल्याची माहितीही मिळत आहे. अशातच सोशल मीडियावर एक बातमी चांगलीच व्हायरल होत आहे. ती म्हणजे बीएसएनएल कंपनीचे सिमकार्ड २४ तासात बंद होणार आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या हवाल्याने सोशल मीडियावर माहिती मिळत आहे. तर तुम्ही केवायसी अपडेट केले नसले तर तुमचे सिमकार्ड येत्या २४ तासात ब्लॉक करून बंद करण्यात येईल. मात्र हे खरं आहे का…

(हेही वाचा – नोटेवर डाग किंवा फाटलेली नोट तुमच्याकडे आहे का? अशा नोटा व्यवहारात चालतात? काय आहे RBI चा नियम?)

केवायसी अपडेटची माहिती पूर्णपणे खोटी असल्याचा दावा पीआयबीने केला असून बीएसएनएल कंपनीचे सिमकार्ड २४ तासात बंद होणार असल्याची माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, बीएसएनएलकडून अशी नोटीस बजावण्यात आल्याचे एका अहवालात म्हटले आहे. तर या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, अशा दाव्यांवर युजर्संना वैयक्तिक आणि बँक तपशील तपशील जारी केले जाते. यानंतर बीएसएनएल केवायसी अपडेटच्या नावावर युजर्सनी ओटीटी किंवा मोबाइल नंबर आणि इतर तपशील देऊ नयेत, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. कारण असे करून हॅकर्स तुमची वैयक्तिक माहितीवर हल्ला करतात, ज्याचा उपयोग बँक फसवणुकीसारख्या घटनांमध्ये होऊ शकतो. त्यामुळे अशी कोणतीही माहिती शेअर करणे टाळावे असेही आवाहन तज्ज्ञांकडून युजर्सना करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.