पाकिस्तानी चित्रपटाला मनसेचा विरोध; सिनेमागृह मालकांना इशारा

173
पाकिस्तानात १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट १३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला, आता तो भारतातील सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात या अशी मागणी होऊ लागली आहे मात्र मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी हा चित्रपट कदापि मुंबईत प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका घेत चित्रपट मालकांना जर हा चित्रपट लावला तर चित्रपटगृहात खळ्ळ खट्याक होईल, असा इशारा दिला.

मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केली, त्याची तोडफोड किंवा त्याचे नुकसान होईल असे कृत्य करु नका.

– अमेय खोपकर, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना.

 

३० डिसेंबर रोजी भारतात होणार प्रदर्शित 

अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचा बहुचर्चित ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट सध्या सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. लवकरच हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या ३० डिसेंबरला हा चित्रपट भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. ‘महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. ‘द लीजेंड ऑफ मौला जट’ हा पाकिस्तानी चित्रपट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट ‘मौला जट्ट’ या चित्रपटाचा रिमेक आहे. यात फवाद खान आणि माहिरा खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने अनेक भारतीय चित्रपटांचे रेकॉर्ड मोडल्याचे बोललं जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.