पुणे शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजमध्ये खाजगी सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना चक्क उठाबशा काढायला लावल्याची धक्कादायक घटना व्हिडीओमुळे समोर आली आहे. सुरक्षेच्या नावाखाली हल्ली महाविद्यालयांमध्ये अथवा शाळांमध्ये खाजगी सुरक्षा रक्षक अथवा बाऊंसर्स ठेवण्याची पद्धत सर्रासपणे सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी याच सुरक्षारक्षकांच्या अरेरावीपणाचे, मुजोरपणाचे आणि दादागिरीचे प्रकार समोर आले आहेत.
मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयात घडलेला हा प्रकार चिड आणणारा असून खाजगी सुरक्षा रक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षा सुनावण्याचा अधिकार कोणी दिला? अशा प्रकारांना वेळेवरच आळा घातला नाही, तर येणाऱ्या काळात या सुरक्षारक्षकांचा मुजोरपणा आणखी वाढणार असून विद्यार्थी आणि पालकांना या बाऊंसर्सकडून वेगवेगळ्या प्रकारे त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
I’d card वरून विद्यार्थ्यांना उठाबशा काढायला लावणे हे अत्यंत चुकीचे आहे, याची दखल घेतली गेली पाहिजे. हा प्रकार पुन्हा घडायला नको याची बाऊंसर्सनी आणि प्राचार्यांनी जबाबदरी घ्यावी.अन्यथा विद्यार्थी मोर्चा काढतील.
-अंजली सुतार
कॉलेज परिसरात जो प्रकार समोर आला आहे. ID card हातातून, गळ्यातून ओडणे, विद्यार्थ्यांना उठाबश्या काढायला लावणे, ही चुकीची पध्द्त होत आहे. ह्या विषयावर कॉलेज प्राचार्यानी लक्ष दिले पाहिजे आणि हा प्रकार परत घडायला नको.
– सोनाली भोईर
बाऊंसर्सकडून वारंवार विद्यार्थ्यांना आयडी कार्डबाबत त्रास देण्यात येत आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना बसू दिले जात नाही. त्यांचे आयडी कार्ड जप्त करून त्यांना कॉलेजमधून बाहेर काढले जाण्याचा प्रकार चालू होता. याबाबतीत आम्ही सर्व विद्यार्थी कॉलेज प्रिन्सिपलकडे दाद मागण्यासाठी गेलो होतो, प्रिन्सीपल आम्हाला अरेरावी उत्तरे देण्यात आली.. बाऊन्सरची चुकी असताना सुध्दा कॉलेज मॅनेजमेंट कडून बाऊन्सर आणि सेक्युरिटी यांची बाजू मांड्यन्यात आली, विद्यार्थ्यानं कडून कोणीच सहकार्य केले नाही.
Join Our WhatsApp Community– ऋषिकेश गिरी