नववर्ष साजरे करण्यासाठी अनेक नागरिक रात्री उशिरा घराबाहेर पडतात. उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : क्वांरटाईनसाठी घेतलेल्या खासगी जागांसाठी सुमारे ८० कोटी रुपये खर्च )
सीएसएमटी स्थानक, मरिन लाईन्स, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी या भागात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. तसेच या दरम्यान देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने मुंबई दर्शन करण्यासाठी येतात. नववर्ष जल्लोषात साजरे केल्यानंतर रात्रीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रात्री लोकल फेऱ्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
मध्य रेल्वेवर ३१ डिसेंबरसाठी विशेष गाड्या
मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (३१ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ मध्यरात्री) प्रवाशांकरीता खालीलप्रमाणे विशेष उपनगरीय सेवा चालविणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून विशेष ट्रेन मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
- कल्याण येथून विशेष ट्रेन मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
- यानंतरची दुसरी विशेष ट्रेन पनवेलकरता सोडण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि ०२.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
- पनवेल येथून विशेष ट्रेन मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.५० वाजता पोहोचेल.
- या सर्व विशेष उपनगरीय ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला मध्य रेल्वेने दिला आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर ८ फेऱ्या
- चर्चगेट ते विरार – रात्री १.१५ वाजता
- चर्चगेट ते विरार – रात्री २.०० वाजता
- चर्चगेट ते विरार – रात्री २.३० वाजता
- चर्चगेट ते विरार – रात्री ३.२५ वाजता
- विरार ते चर्चगेट – रात्री १२.१५ वाजता
- विरार ते चर्चगेट – रात्री १२.४५ वाजता
- विरार ते चर्चगेट – रात्री १.४० वाजता
- विरार ते चर्चगेट – रात्री ३.०५ वाजता