१९९५ पूर्वीचा आणि १९९५ नंतरचा महाराष्ट्र यात फरक आहे. १९९५ पूर्वीचे आणि नंतरचे पुणे यात फरक आहे. आता चार चार पुणे झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी भाषणांमध्ये सांगत होतो, मुंबई बर्बाद व्हायला मोठा काळ गेला. पण पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
आपले संपूर्ण आयुष्य राजकारणाशी बांधिल
या दरम्यानच्या काळात साहित्य, नाटक, चित्रपट आणि राजकारण बदलले. बदल हा आवश्यक असतो हे मान्य पण बदल आपल्या जीवावर उठणारा असेल तर काय करायचे, असे राज ठाकरे म्हणाले. १९९५पर्यंत सगळ्या चळवळी सगळे राजकीय पक्ष मध्यमवर्गीयांच्या हाती होत्या. ते उच्चवर्गीय आणि गरिबांमधील दुवा होते. १९९५ नंतर हे चित्र बदलले. राजकारणाला मोठ्या वर्गाची गरज आहे, तो त्याला तुच्छ मानायला लागला, असे राज ठाकरे म्हणाले. प्रत्येक वर्गातील विचार करणारी लोक मागे झाली आणि सगळा स्तर घसरायला लागला. १९९५ पूर्वी आणि नंतर महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचारात फरक आहे. आपण सुशिक्षित असून चालणार नाही, आपल्याला काय करायचे आहे, त्याच्याशी म्हणून आपण राजकारणापासून दूर राहतो. पण, आपले संपूर्ण आयुष्य राजकारणाशी बांधिल आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. आपल्याला दूध, पाणी, वीज लागते याचा भाव राजकारण आणि प्रशासन ठरवते. आपण ते निमूटपणे भरत जातो काही विचारत नाही. शाळेचा अभ्यासक्रम सरकार ठरवते, जे समोर पदरात पडते ते तुम्ही निमुटपणे स्वीकारता. अनेक तरुण मुले तरुण मुली परदेशात जातात इथे राहायचे नाही, असे म्हणतात. तुमचे शांत राहणे, तुमचे गप्प राहणे, तुमचा समावेश राजकारणात नसणे, याने आजूबाजूचा परिसर बरबाद होतो, हे आपण उघड्या डोळ्याने पाहत आहोत, असे राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community