National testing agency कडून CUET PG 2023 परीक्षेसाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. NTA च्या माहितीनुसार, 1 जून ते 10 जून 2023 या कालावधीत पुढील शैक्षणिक सत्रासाठी पोस्ट ग्रॅज्युएट कोर्ससाठी काॅमन यूनिवर्सिटी एंट्रांस परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. ज्यासाठी अर्जाची प्रक्रिया मार्च 2023 च्या मध्यात सुरु होईल. यावर्षी CUET- PG च्या माध्यमातून पोस्ट ग्रेज्युएशन अॅडमिशनसाठी 30 हून अधिक केंद्रीय विद्यापीठांनी सहभाग घेतला होता.
परीक्षेसाठी ‘या’ दिवसापासून अर्जप्रक्रिया
विद्यापीठ अनुदान आयोगाचे एम जगदीश कुमार यांनी सांगितले की, या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया मार्चच्या मध्यभागी सुरु होईल. यूजीसी चेअरमन पुढे म्हणाले की, CUET- PG स्कोअर वापरुन विद्यार्थी अनेक विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतील. विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी असेल. ते म्हणाले की, CUET PG ची ही दुसरी आवृत्ती असेल. यावर्षी 30 हून अधिक केंद्रीय विद्यापीठांनी पोस्ट ग्रेज्युएशन अॅडमिशनसाठी या प्रवेश परीक्षेत भाग घेतला.
( हेही वाचा: मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजनेत करा गुंतवणूक! होईल लाखोंचा फायदा)
‘या’ तारखेपासून परीक्षा
अंडर ग्रॅज्यूएशन कोर्स म्हणजेच पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 21 मे ते 31 मे 2023 या कालावधीत CUET घेण्यात येणार आहे. यावर्षी CUET -UG मध्ये 90 हून अधिक विद्यापीठांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. CUET- PG परीक्षेचा निकाल जुलै 2023 च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल. CUET- UG चे निकाल जून 2023 च्या तिस-या आठवड्यात घोषित केले जातील. यूजीसीच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, याचे शैक्षणिक सत्र यावर्षी 1 ऑगस्ट 2023 पासून सुरु होईल.
Join Our WhatsApp Community