जगभरातील अनेक भागांत Twitter पुन्हा डाऊन; नेटकरी हैराण

128

मायक्रोब्लाॅगिंग प्लॅटफाॅर्म ट्वीटरची सेवा बुधवारी सकाळपासून डाऊन झाली होती. Downdetector.com या वेबसाईटच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपासून जगभरात ट्वीटर डाऊन झाले होते. हजारो वापरकर्त्यांना ट्वीटर वापरण्यात अडथळे येत होते. मोबाईल आणि डेस्कस्टाॅप दोन्ही युजर्सना ट्वीटरच्या साइटवर लाॅग इन करण्यात अडचण येत होती. वापरकर्त्यांना Something is Error, please try again असे पाॅप- अप मेसेज येत होते.

( हेही वाचा: महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालयांना सील )

जगभरात ट्वीटर डाऊन

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेमध्ये सकाळी 7:40 पर्यंत 10 हजार हून अधिक यूजर्सना ट्वीटर वापरण्यात अडचणी येत होत्या. काही युजर्सनी संगितले की, ते त्यांच्या अकाऊंटवरुन सारखे लाॅग आऊट होत आहेत, तर इतरांनी तक्रार केली की त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन लाॅग इन करण्यात अडथळा येत आहे.

मस्क यांनी ताबा घेतल्यानंतर दुस-यांदा ट्वीटर डाऊन

एलाॅन मस्क यांनी ताबा घेतल्यानंतर, दुस-यांदा ट्वीटर डाऊन झाले आहे. 4 नोव्हेंबरला देखील ट्वीटर डाऊन झाले होते. दरम्यान, आता काही भागात ट्वीटरची सेवा पूर्ववत झाली आहे. तर काही भागात अद्यापही ट्वीटर डाऊन आहे. काही भागात ट्वीटर सुरु झाल्यानंतर युजर्सने ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.