पश्चिम रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याच्या येणा-या गाड्या धुक्यामुळे उशिराने धावत आहेत. त्यामुळे याचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला आहे. पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील लोकलची वाहतूक सध्या 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरु आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत कार्यलयात जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या गुजरातहून मुंबईच्या दिशेने येतात, त्या धुक्यामुळे उशीराने धावत असल्याने, परिणामी चर्चगेटच्या दिशेने येणा-या लोकलही विलंबाने धावत आहेत.
( हेही वाचा: जगभरातील अनेक भागांत Twitter पुन्हा डाऊन; नेटकरी हैराण )
Join Our WhatsApp Community