‘राऊतांना वेड्यांच्या रुग्णालयात भर्ती करा, ठाकरे गट म्हणजे दोस्ताना पार्ट 3’, राणेंचा घणाघात

153

भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. तर संजय राऊतांवरही त्यांनी निशाणा साधला आहे. वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा, असे म्हणत ठाकरे गट म्हणजे दोस्ताना पार्ट 3, असेही नितेश राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

राणेंच्या निशाण्यावर राऊत

संजय राऊत यांचा वरचा भाग सटकलेला आहे. आपल्या नागपूर किंवा राज्यात वेड्यांचे रुग्णालय असेल, तिथे संजय राऊत यांना ठेवा. त्यांची थर्टी फस्टची पार्टी वेड्यांच्या हाॅस्पिटलमध्ये व्हायला हवी, असेही नितेश राणे म्हणाले. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कार्यलयावरुन बुधवारी राडा झाला. शिंदे गटाने या कार्यलयावर ताबा मिळवला. त्यावरुनही नितेश राणे यांनी वक्तव्य केले आहे. राणे म्हणाले की, ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यलय आहे. त्यांचा अधिकार ते घेणारच. जे बाळासाहेबांचे आहे ते सर्व शिंदेंचे आहे. उद्धव ठाकरे यांचा वाटीएवढा ग्रुप राहिला आहे. त्यामुळे त्यांनी हा हट्ट सोडला पाहिजे.

( हेही वाचा: ‘जो बायडेन आणि पुतीन यांच्यात चर्चा, उद्धव ठाकरे कोण आहेत’?; राऊतांचं भाषण व्हायरल )

वाझेला फोन करणा-यांची नावे आमच्याकडे?

उद्धव ठाकेर काय बाॅम्ब फोडणार आहेत? त्यांच्या मनगटात ताकत नाही. ते फक्त पॅन्टीतले बाॅम्ब आहेत. त्यांना महत्त्व देऊ नका. सचिन वाझेला बेटिंगसाठी फोन गेले. त्यांची नावे आमच्याकडे आहेत. त्या सर्वांची चौकशी व्हायला हवी, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.