WTC 2023 : दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचा टीम इंडियाला फायदा! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला संधी

144

सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. सोमवारपासून या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरूवात झाली. ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेतील २ सामने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचा फायदा भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे.

( हेही वाचा : केंद्र सरकारच्या PMGKAY योजनेत मोठा बदल! कोणाला मिळणार मोफत अन्नधान्याचा लाभ? )

ऑस्ट्रेलिया पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानी 

अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अगदी सहज पोहोचेल. अलिकडेच झालेल्या बांगलादेशविरुद्ध सामन्यात भारताच्या विजयामुळे टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील मार्ग सोपा झाला आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया ७८.५७ गुणांसह पहिल्या स्थानी आहे, तर भारतीय संघ ५८.९३ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंका तिसऱ्या स्थानी तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ चौथ्या स्थानी गेला आहे.

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय आवश्यक 

जर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला ३-० ने हरवले तर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त कोणत्याही फरकाने विजय मिळवावा लागेल. भारताचा पुढचा कसोटी सामना हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाणार आहे. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही कसोटी मालिका ३-१, ३-०, किंवा २-२ ने जिंकणे आवश्यक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.