पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना अहमदाबाद येथील यू एन मेहता रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले होते. त्यांना रूटीन चेकअपसाठी यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये नेण्यात आले होते. दरम्यान, आज गुरूवारी यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरकडून मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट देण्यात आली आहे.
(हेही वाचा – BEST Recruitment 2023: BMC अंतर्गत चालक, वाहक पदांच्या 12,350 जागेवर महाभरती? BEST ने स्पष्टच सांगितले…)
हिराबेन मोदी यांच्या प्रकृतीबद्दलची अपडेट यू एन मेहता रूग्णालय व्यवस्थापनाने मेडिकल बुलेटिन जारी करून दिली असून त्यामध्ये हिराबा मोदी यांची प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले आहे.
गेल्या १८ जून रोजी हीराबेन मोदी यांचा १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी एक भावनिक पोस्टही लिहिली होती जी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तर गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये मोदींनी त्यांच्या आईची भेट घेतली होती.
Join Our WhatsApp Community