दोन्ही शिवसेना गटांच्या वादात महापालिकेतील इतर पक्षांची कार्यालय ही बंद करण्यात आले आहे. मात्र शिवसेनेच्या या इन करेक्ट कार्यक्रमामुळे या पक्ष कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचारी वृंदांचे मोठे हाल होणार आहेत. ही कार्यालय बंद करण्यात आल्यास याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागेल. परिणामी त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होणार असून वाद निर्माण झालेल्या शिवसेना पक्ष कार्यालयाला पुढील निवाड्यापर्यंत बंद ठेवून इतर पक्ष कार्यालय उघडण्यात यावीत. जेणेकरून या पक्ष कार्यालयातील कर्मचारी बेरोजगार होणार नाही.
मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालयाला सील ठोकण्यात आले असून त्यामुळे यासर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आज कार्यालयाबाहेर बसून दिवस काढावा लागला. शिवसेना पक्ष कार्यलयात ३ कर्मचारी, भाजप पक्ष कार्यालयात ४ कर्मचारी, काँग्रेस पक्ष कार्यलयात ३, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्ष कार्यालयात प्रत्येकी १ या प्रमाणे एकूण १२ कर्मचारी आहेत. नगरसेवकांच्या सेवेसाठी आणि कार्यालयीन कामासाठी असलेल्या या कर्मचाऱ्यांना कार्यलय बंद अभावी बाहेर बसावे लागले. पक्षाच्या नेत्यांनीही त्यांची विचारपूस केली नाही.
शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून उद्धव ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात वाद असून या पक्ष कार्यालयावर दावा ठोकत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या प्रयत्नात त्यातील कर्मचाऱ्यांच्या पोटावरच पाय दिला आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष कार्यालय सुरळीत सुरू असताना हल्ला बोल मोर्चाची रणनीती याच कार्यालयात बसून शिवसेना आमदार न खासदार आणि नेत्यांनी बसून केली होती, तेव्हाच हे कार्यालय प्रशासनाच्या रडार वर होते. आता या वादाचे निमित्त प्रशासनाला मिळाले असून या वादाचा फटका पक्ष कार्यालयातील गरीब कर्मचाऱ्यांना बसणार आहे.
Join Our WhatsApp Community