महागाई इतकी वाढली आहे की, सर्वसामान्य जनता या महागाईने त्रस्त झाली आहे. अशातच तुम्हाला मोफत वीज मिळणार असेल तर…. तुम्हालाही मोफत वीज हवी असेल तर ही बातमी नक्कीच जाणून घ्या. सरकारने नुकतीच 100 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. पण यासाठी तुम्हाला तुमचे वीज कनेक्शन आधार क्रमांकाशी लिंक करावे लागणार आहे. पण थोडं थांबा… कारण ही घोषणा महाराष्ट्र सरकार नाही तर तामिळनाडू सरकारने जाहीर केली आहे. आता तामिळनाडू राज्यातील ज्या ग्राहकांनी त्यांचे वीज कनेक्शन आधार क्रमांकाशी लिंक केले असेल तर त्यांना एका महिन्यात 100 युनिट मोफत वीज मिळणार आहे.
(हेही वाचा – Covid-19: … म्हणून ‘या’ जिह्यात तब्बल ३७ हजार बुस्टर डोस कचऱ्याच्या ढिगाऱ्यात!)
सरकारने केली मोठी घोषणा
सरकारच्या या घोषणेनंतर तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कंपनी (TANGEDCO) ने ग्राहकांचे आधार कार्ड त्यांच्या ग्राहक क्रमांकाशी लिंक करण्यास सुरुवात केली आहे. पण, आता यासंदर्भातील नवीन तक्रारी समोर येत आहेत. अशातच तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कंपनीच्या कार्यालयात यासाठी करण्यात आलेल्या काउंटरवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात त्रास होत असल्याच्या तक्रारी आता येत आहेत.
सरकारकडून वीज विभागाच्या अधिकार्यांना आदेश
दरम्यान, उर्जा मंत्री व्ही सैंथिल बालाजी यांनी चेन्नईमध्ये बनवलेल्या एका काउंटरची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना योग्य व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. तामिळनाडू सरकारने आता वीज विभागाच्या अधिकार्यांना आदेश दिले आहेत की, वीज कनेक्शन आधारशी जोडण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये. एवढेच नाही तर त्यासाठी सरकारकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community