मुंबई अग्निशमन दलाची ९१० रिक्त पदे भरणार, प्रसिध्द झाली जाहिरात

203

मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने अग्निशामक वर्गातील ९१० रिक्त पदे भरली जाणार असून याबाबतची जाहिरात मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने प्रसिध्द करण्यात आली आहे. ही जाहिरात मुंबई महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ९१० पदांमध्ये ४३४ पदे ही खुल्या प्रवर्गात असून ही पदे सरळ सेवेने अर्थात वॉक इन सिलेक्शन पध्दतीने भरली जाणार आहे. या सरळ सेवेमधील भरतीसाठी १३ जानेवारी २०२३पासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक आरक्षण गटानुसार या भरतीचे अर्ज स्वीकारण्याचे शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२३पर्यंत असेल.

विमाप, भज ब, भज क, भज ड, अजा, अज, आर्थिक दुर्बल घटक, इमाव, माजी सैनिक व अनाथ, खुला प्रवर्ग, विजाअ आणि महिला याप्रकारे प्रत्येक आरक्षित गटांचे टक्केवारीच्या क्रमवारीनुसार निश्चित केलेल्या प्रत्येक दिवशी सकाळी आठ पर्यंत स्वीकारले जाणार असल्याचे मुंबई अग्निशमन दलाने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत म्हटले आहे.

एकूण पदे : ९१०

  • अनुसूचित जाती : ९९
  • अनुसूचित जमाती :२६
  • विजा : १८
  • भटक्या जमाती(ब) : १४
  • भटक्या जमाती(क) : २२
  • भटक्या जमाती(ड) :
  • विशेष मागासवर्गीय प्रकल्प : ०८
  • इतर मागासवर्गीय वर्ग : १७३
  • आर्थिक दुर्बल घटक : ९१
  • खुला प्रवर्ग :४४३
  • माजी सैनिक : १३६
  • खेळाडू :४६
  • प्रकल्पग्रस्त :४६
  • भूकंपग्रस्त : १७
  • महिला :२७३
  • सर्वसाधारण आरक्षण : ३९२

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची कला, विज्ञान, किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12 वी किमान 50 टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता

  • शारीरिक आणि मानसिकदृष्टया सदृढ असावा. सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असावा.
  • उमेदवाराकडे खालील नमूद केलेला किमान शारिरीक दर्जा असणे आवश्यक आहे.
  • उंची- किमान १७२ से.मी. (पुरुषांसाठी)
  • उंची – किमान १६२ से.मी. (महिलांसाठी)
  • छाती- ११से.मी. (साधारण) ८१ से. मी. (फुगवून, महिलांसाठी छातीची अट लागू नाही)
  • वजन किमान ५० कि.ग्रॅ.
  • दृष्टी- चष्मा किंवा तत्सम साधनांशिवाय नेहमीची (सामान्य)

वयोमर्यादा

  • उमेदवारांचे वय दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी २० वर्षापेक्षा कमी व २५ वर्षापेक्षा जास्त नसावे. परंतु कोविड-१९ सार्वत्रिक साथरोगामुळे भरती प्रक्रीया राबविण्यात आलेली नसल्यामुळे फक्त या भरती प्रक्रीयेकरिता एक वेळची उपाययोजना म्हणून उमेदवारांचे वय ३१ डिसेंबर २०२२ रोजी २० वर्षापेक्षा कमी व २७ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • उमेदवार ‘डि.ओ.ई.ए.सी.सी. सोसायटीचे ‘सी.सी.सी. ‘किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा १’सी’ स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे ‘एम.एस.सी.आय.टी. किंवा ‘जी.ई.सी.टी.’ चे प्रमाणपत्रधारक असावा किंवा महाराष्ट्र शासन या संदर्भात वेळोवेळी आदेश काढून निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परंतु अर्ज सादर करताना ती परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नसल्यास निवड झालेल्या उमेदवाराने नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत शासनाने विहित केलेली ‘एम.एस.सी.आय.टी.’ ची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल.

परीक्षा शुल्क

खुला व अराखीव शुल्क :९४४ रुपये

मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटक तथा अनाथ आरक्षण अंतर्गत :५९० रुपये शुल्क

(विशेष सूचना मुंबई महापालिकेच्या या http;//portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर भेट देत पाहून घ्यावी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.