पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक : राजकीय वर्तुळातून हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

170

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. मोदींनी ट्वीटरवरून यासंदर्भातील माहिती दिली. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन मोदी यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान मोदींच्या आईचे निधन झाले. आईच्या अंत्यसंस्कारासाठी मोदी स्वत: अहमदाबादला येणार असून महाराष्ट्रासह देशातील दिग्गज नेतेही अहमदाबादला जाणार आहेत.

हिराबेन मोदी यांना राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली

आई ही जीवनातील पहिली गुरु – अमित शहा

हिरा बा यांनी कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी केलेला संघर्ष सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांचे त्यागाचे तपस्वी जीवन सदैव आपल्या स्मरणात राहील. या दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण देश पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबासोबत उभा आहे. करोडो लोकांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत. ओम शांती… आई ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील पहिली मैत्रीण आणि गुरू असते, तिला गमावल्याचे दुःख हे जगातील सर्वात मोठे दुःख आहे. असे ट्वीट करत अमित शहांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुःखात सहभागी – मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आम्ही सर्व नरेंद्र मोदीजी यांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करत हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हिराबेन मोदीजी, यांचा संघर्ष आणि तपस्वी जीवन सदैव स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे ट्वीट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचं समजून दुःख झालं. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचं दुःख मोठं असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो असे ट्वीट करत अजित पवार यांनी हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.