आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्र सरकारचे नवे नियम! ‘या’ देशांतून येणाऱ्या नागरिकांना RTPCR बंधनकारक

121

जगभरात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चीनमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर झाल्यामुळे सर्व देशांमधील आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झाल्या आहेत. भारतात अजूनही कोरोनाची चौथी लाट आलेली नाही परंतु कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात भारतीय आरोग्य मंत्रालयाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भारताजवळील सहा देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

( हेही वाचा : IRCTC कडून प्रवाशांना भन्नाट ऑफर! फिरायला जाताना ६०० रुपयांपासून बुक करा सुंदर हॉटेल्स)

‘या’ देशांमधून येणाऱ्या नागरिकांना RTPCR चाचणी सक्तीची

चीन, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंड आणि जपान या ६ देशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची RTPCR चाचणी करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२३ पासून हे नवे नियम लागू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्वीट करत दिली आहे.

निगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक 

१ जानेवारीपासून चीन, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंड आणि जपान या ६ देशांमधून येणाऱ्या नागरिकांनी आपली RTPCR चाचणी करून त्याचा निगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करायचा आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.