मुलुंड येथे घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

174

मुलुंड पश्चिम येथे एका घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४० वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या दुर्घटनेत महिलेचा पती गंभीर जखमी असून त्याला अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

( हेही वाचा : पोहायचे आहे का? या जलतरण तलावाचे सभासद होण्याची संधी…)

जीर्ण भिंत अंगावर पडून महिलेचा मृत्यू

लक्ष्मीबाई कातडे (४०) असे मृत महिलेचे नाव असून रघुनाथ कातडे (५०) हे जखमी झाले आहेत. हे दाम्पत्य मुलुंड पश्चिमेतील हनुमान पाडा येथे एका चाळीत राहत होते. कातडे दाम्पत्य राहत असलेल्या घराच्या शेजारिच रिकामी व जुन्या झालेल्या घराची जीर्ण भिंत शुक्रवारी पहाटे साखरझोपेत असलेल्या कातडे दाम्पत्यांच्या अंगावर पडून दोघेही भिंती खाली अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बीएमसीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी भिंतीखाली अडकलेल्या कातडे दाम्पत्याला बाहेर काढून तात्काळ अग्रवाल सर्वसामान्य रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी लक्ष्मीबाई कातडे यांना तपासून मृत घोषित केले. तसेच रघुनाथ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतले. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.