मुंबई कस्टम झोन ३ ने आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी आणलेले आणि कारवाईत जप्त केलेले, जवळपास ५३८ कोटींचे १४० किलो ड्रग्स मुंबई कस्टम विभागाच्या वतीने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी नष्ट करण्यात आले.
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी ड्रग्स विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. तर कस्टम विभाग या सर्व टोळ्यांवर नेहमीच कारवाई करत असते, याच अनेक कारवाईत जप्त केलेले ड्रग्स नष्ट करण्यात आले. यावेळी मुंबई कस्टम विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत १६ प्रकरणांत जप्त केलेले ड्रग्ज या वेळी नष्ट करण्यात आले. विविध क्लुप्त्या लढवून अमली पदार्थांची तस्करी होत असते, पण अधिकारी ही तस्करी पकडतात आणि कारवाई करतात, असे प्रिन्सिपल कमिश्नर कस्टम झोन 2 राजेश सनम म्हणाले.
(हेही वाचा आटपाडीत ख्रिस्त्री धर्मांतराचे कारस्थान; आमदार पडळकरांनी मांडली लक्षवेधी)
Join Our WhatsApp Community