११ डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. यानंतर समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना घडल्या यामुळे प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. समृद्धी महामार्गावर १ जानेवारीपासून स्पीड गन बसवण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाला गमवावे लागले प्राण, बोगस डॉक्टर दाम्पत्यविरोधात गुन्हा दाखल)
परिवहन विभागाचा मोठा निर्णय!
माहितीनुसार, गेल्या १८ दिवसांमध्ये समृद्धी महामार्गावर जवळपास ४० हून अधिक अपघात होऊन यात ७ जणांचा मृत्यू झाला आणि तब्बल ३३ जण जखमी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता परिवहन विभागाने स्पीड गन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांसाठी वेगमर्यादा १२० असा नियम काढण्यात आला आहे. परिवहन आयुक्त विविके भीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक कार्यालय नागपूर (RTO) येथे समृद्धीवरील अपघातांना आळा घालण्यासाठी बैठक घेण्यात आली होती.
स्पीड गन म्हणजे काय?
अतिवेगात निघालेल्या वाहनाचा क्रमांक कॅमेराद्वारे टिपून त्याची माहिती वाहतूक यंत्रणेस देऊन कारवाई करणे म्हणजे स्पीड गन कॅमेरा प्रणाली होय. ज्या कारने वेगमर्यादेचे उल्लंघन केले त्या वाहनाचा क्रमांक वाहतूक पोलिसांनी लावलेल्या लेझर कॅमेराद्वारे टिपून सर्व माहिती आपोआप यंत्रणेत नोंदवली जाते व थेट वाहन चालकांना मोबाईलवरच दंडाचा मेसेज जातो.
Join Our WhatsApp Community