मंत्रालयात शिपायांनी राबवली बोगस भरती प्रक्रिया; विधानसभेत पडसाद

135

मंत्रालयात शिपाई कर्मचाऱ्यांनी बोगस भरती प्रक्रिया राबविल्याची बाब उघडकीस आली आहे. शुक्रवारी विधानसभेत त्याचे पडसाद उमटले. या विषयावर विरोधीपक्ष नेते अजित पवार आक्रमक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

( हेही वाचा : चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाला गमवावे लागले प्राण, बोगस डॉक्टर दाम्पत्यविरोधात गुन्हा दाखल )

अजित पवार म्हणाले, मंत्रालयात ‘क’ संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरु असल्याचे खोटे सांगून मंत्रालयातील शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरतीप्रक्रिया राबवली. या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनात उमेदवारांच्या बोगस मुलाखतींचं नाटक घडवून आणलं. यातून अनेक युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे.

मंत्रालयात उपसचिवांच्या दालनातंच झालेल्या या बनवेगिरीची सखोल चौकशी करावी. दोषींना शिक्षा करावी आणि फसलेल्या तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत माहितीचा मुद्दा उपस्थित करुन केली.

कठोर कारवाई करणार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगितले. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासण्यात येईल, असे त्यांनी उत्तरादाखल सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.