महानगरपालिका निवडणुकांसाठी ‘मनसे’ सज्ज! मुंबईतील प्रत्येक मतदार संघामध्ये होणार सभा

126

मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुंबई मनपा निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

( हेही वाचा : समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाने घेतला मोठा निर्णय!)

मनसेचे ‘घे भरारी’ अभियान 

मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेकडून ‘घे भरारी’ अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत मनसेने केलेल्या आजवरच्या कामांची माहिती लोकांना देण्यात येणार आहे. मुंबईत एकूण ३६ विधानसभा मतदार संघ आहेत. या सर्व मतदार संघात मनसे पक्षाची किमान १ सभा आयोजित केली जाणार आहे. या सभेसाठी वक्त्यांची यादी फायनल करण्यात आली असल्याची माहिती मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिली आहे.

३६ विधानसभा मतदार संघात १ सभा 

मनपा निवडणुकीत भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे असे नवे समीकरण पहायला मिळणार का अशा चर्चा रंगल्या होत्या परंतु आता मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. बैठकीनंतर प्रकाश महाजन यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील ३६ विधानसभा मतदार संघात मनसे पक्षाची किमान १ सभा आयोजित करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.