ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी ही ०३ जानेवारी २०२३ रोजी पासून बाळकुम पाईपलाईन येथे घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा मार्ग ०३ जानेवारीपासून ते मैदानी चाचणी पूर्ण होईपर्यंत पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात येणार असून, या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
( हेही वाचा: नवीन वर्षाच्या सुरुवातीला रुग्णसेवा राज्यभरात विस्कटणार; ‘या’ शहरांत होणार मोठा दुष्परिणाम )
वाहतूकीत बदल पुढीलप्रमाणे
- प्रवेश बंद – साकेत बाळकुम मार्गावरील ग्लोबल हॉस्पिटल समोरील पाईपलाईन मार्गे दादलानी रोडकडे जाणारे पादचारी, सर्वसामान्य नागरिक तसेच सर्व प्रकारच्या वाहनांना ग्लोबल हॉस्पिटल समोर प्रवेश बंद करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग – सदर मार्गावरून जाणारे पादचारी, सर्वसामान्य नागरिक तसेच सर्व प्रकारची वाहने ही साकेत बाळकुम रोड मार्गे बाळकुम सिग्नल, बाळकुम पाडा नं. १ दादलानी रोड मार्गे इच्छीत स्थळी जातील.
- प्रवेश बंद – दादलानी रोड कडून पाईपलाईन मार्गे ग्लोबल हॉस्पिटल कडे जाणारे पादचारी, सर्वसामान्य नागरिक तसेच सर्व प्रकारच्या वाहनांना मल्टीकार वर्कशॉप, तरबेज इंटरप्रायजेस दादलानी रोड समोरील बृहन्मुंबई महानगरपालिका मार्ग या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग – सदर मार्गावरून जाणारे पादचारी सर्वसामान्य नागरिक तसेच सर्व प्रकारची वाहने ही दादलानी रोड, बाळकुम रोड मार्गे इच्छीत स्थळी जातील.
ही अधिसुचना फायर ब्रिगेड, पोलीस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळवले आहे.
Join Our WhatsApp Community