भाजप नेते आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या दादरमधील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी राणे यांनी सपत्नीक ही भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर या राणे आणि ठाकरे भेटीला विशेष महत्त्व आहे. या भेटीदरम्यान, राज ठाकरे आणि नारायण राणे हे शिवतीर्थाच्या गॅलरीत पाहायला मिळाले.
( हेही वाचा: ‘हे’ पाच नेते नव्या वर्षात सोमय्यांच्या निशाण्यावर’; ट्वीट करत ‘मविआ’ला इशारा )
…म्हणून राणे आणि ठाकरे यांच्या भेटील विशेष महत्त्व
ही भेट वैयक्तिक कारणासाठी घेण्यात आली आहे, असे जरी सांगण्यात आले असले तरी दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा त्यांच्यात राजकीय मुद्यांवर चर्चा होणे सहाजिकच आहे. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशात ठाकरे गटाला टक्कर द्यायची असेल तर तितकेच राजकीय बळ लावावे लागणार आहेत. त्यामुळे युतीत विविध पक्षांचा समावेश करण्यासाठी हालचाली वाढत असल्याचे बोलले जात आहे. अशात राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे.
Join Our WhatsApp Community