थर्टीफर्स्टला बॉम्बस्फोट होणार! निनावी कॉलमुळे मुंबईत खळबळ, धारावीतून एकाला अटक

158

३१ डिसेंबर रोजी मुंबईत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनावी कॉल आल्यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली. परंतु कॉल करणाऱ्या व्यक्तीने मद्याच्या नशेत हे कृत्य केल्याचे समोर येताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून धारावीतून त्याला अटक करण्यात आली आहे.

( हेही वाचा : मुलुंड अगरवाल रुग्णालय : महापालिकेचे सुमारे १३९ कोटी वाचले, भूखंडासह इमारतीची वास्तूही मिळणार मोफत बांधून)

नरेंद्र कवळे (३८)असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नरेंद्र हा ओला कॅब चालक असून धारावी परिसरात कुटुंबियांसह राहत आहे. ३० डिसेंबर रोजी त्याने मद्याच्या नशेत मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात फोन करून नाव न सांगता मुंबईत ३० आणि ३१ डिसेंबर रोजी तीन-चार ठिकाणी बॉम्बस्फोट होणार आहेत. अजहर हुसैन, आझमगड, उत्तरप्रदेश येथून निघाला आहे आणि त्याच्याकडे तीन-चार हत्यारे आहेत, आर. डी. एक्स आहे, तो धारावीतील राजीव गांधी नगर, धारावी, ओ.एन.जी.सी. गेट समोर राहतो” असे सांगून या आरोपीने कॉल बंद केला.

या कॉलमुळे मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता व मुंबईत सर्वत्र तपासणी सुरू करण्यात आली येत होती. दरम्यान पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला हा कॉल धारावी परिसरातून आल्याचे समोर आले. धारावी पोलिसांनी तात्काळ कॉल करणाऱ्यांची माहिती काढून नरेंद्र कवळे याला ताब्यात घेण्यात आले. मोठ्या भावाने मारहाण केल्यामुळे नरेंद्र याने मद्यपान केले त्यानंतर धारावीत राहणाऱ्या अजहर हुसैन याला पोलीस फेऱ्यात अडकविण्यासाठी त्याने नियंत्रण कक्षाला कॉल केल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी नरेंद्र कवळे याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.