राज्यावरची सर्व संकटे दूर होवोत. प्रलंबित विकास प्रकल्प पूर्ण होवोत. हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचे आणि समृद्धीचे जावो, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या नवीन वर्षात अनेक ठिकाणी विकासाचे पर्व सुरु व्हावे, तसेच राज्यातील शेतकरी समाधानी व्हावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ठाण्यातील जांभळी नाका शिवाजी मैदान येथे रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दिवंगत आनंद दिघे यांनी हे रक्तदान शिबिर सुरु केले होते.
रक्तदानाचा उपक्रम खूप महत्त्वाचा
रक्तदान हे जीवनदान आहे. न चूकता काहीजण रक्तदान करत असतात. सर्व रक्तदात्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले. रक्त हे बनवता येत नाही, ते दान करावे लागते. पोलीस, जवान, महिलादेखील या रक्तदानाच्या उप्रकमात सहभागी होतात. आनंद दिघे यांनी सुरु केलेला हा रक्तदानाचा उपक्रम खूप महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
(हेही वाचा: उर्दू भाषा भवनाबाबत बाल आयोगाची महापालिकेला नोटीस, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश )
मुख्यमंत्र्यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन केले
मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले आहे. यावेळी पोलिसांनी, महिलांनी देखील रक्तदान केले. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. कोणताही गाजावाजा न करता लोक स्वत:हून रक्तदान करत आहेत. एका दिव्यांग व्यक्तीने 121 वेळा रक्तदान केले आहे. प्रकाश नाडर असे त्यांचे नाव आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community