पोर्तुगाल फुटबाॅल संघाचा स्टार खेळाडू 37 वर्षांचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो हा सौदी अरेबियाचा क्लब अल- नासर एफसीत दाखल झाला. रोनाल्डोने 2025 पर्यंत या क्लबशी करार केला आहे.
200 मिलियन युरो
रोनाल्डो यापूर्वी इंग्लंडच्या मॅंचेस्टर युनायटेडकडून खेळत होता. मात्र, वादामुळे फिफा विश्वचषकापूर्वी त्याने करार मोडला. आता नव्या करारामुळे 1 हजार 775 कोटी त्याला क्लबकडून मिळणार आहेत. 37 वर्षीय रोनाल्डोने 2025 पर्यंत अल नस्सरसोबत करार केला आहे. यासाठी त्याला 200 मिलियन यूरो मिळणार आहेत. फूटबाॅल क्लब अल नस्सरने याची माहिती दिली आहे. रोनाल्डोच्या समावेशामुळे अल नस्सरचा संघ मजबूत होईल. क्लबने नऊ सौदी प्रो लीग विजेतेपदे जिंकली आहेत. या संघाला आता प्रथमच एएफसी चॅम्पियन्स लीग जिंकण्याची आशा असेल.
( हेही वाचा: झोप किंवा ओव्हरस्पीडिंग नाही! ऋषभने स्वत: सांगितले अपघाताचे खरे कारण; DDCA च्या संचालकांनी दिली माहिती )
रोनाल्डोने 2009-18 पासून स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदसोबत उत्कृष्ट खेळ केला. या काळात त्याने दोन ला लीग, दोन स्पॅनिश चषक, चार- चॅम्पियन्स लीग विजेतेपद आणि तीन क्लब विश्वचषक जिंकले आहेत. रोनाल्डोने क्लब आणि देशासाठी एकूण 800 हून अधिक गोल केले आहेत. रोनाल्डोने युव्हेंटसमध्ये तीन वर्षात दोन सेरी ए जेतेपद आणि एक कोपा इटालिया ट्राॅफीही जिंकली.
Join Our WhatsApp Community