Rishabh Pant Car Accident: ‘हे’ आहेत मृत्यूला चकवा देणारे ५ क्रिकेटपटू

123

भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत कार दुर्घटनेतून थोडक्यात बचावला. त्याला काही ठिकाणी दुखापत झाली असली, तरी कारची एकूण अवस्था बघता, तो या मोठ्या अपघातातून सुदैवाने थोडक्यात बचावला, असे म्हणता येईल. पंत यातून लवकर सावरेल आणि आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झोकात पुनरागमन करेल. मात्र, मृत्यूला चकवा देणारा ऋषभ पंत हा काही पहिलाच क्रिकेटपटू नाही. याआधीही अनेक क्रिकेटपटू मोठ्या अपघातात सुदैवी ठरले आहेत.

मोहम्मद शमी ( भारत)

चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 ला भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या कारला अपघात झाला होता. त्यावेळी शमीच्या डोक्याला मार लागला होता. शिवाय डाव्या डोळ्यांच्यावर तीन ते चार टाकेही लागले होते. मात्र, यातून सावरत शमीने शानदार पुनरागमन केले. त्या वर्षात शमीने 47 बळी घेतले आणि नंतर एकदिवसीय संघातही तो पुन्हा निवडला गेला.

मन्सुर अली खान पतौडी ( भारत)

भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणल्या जाणा-या मन्सूर अली खान पतौडी यांनी 20 वर्षांचे असताना, त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती. एका अपघातात त्यांच्या डोळ्यात काच घुसली होती. मात्र, उपचारावेळी त्यांनी हार मानली नाही आणि पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

( हेही वाचा: रोनाल्डो मालामाल! दररोज कमवणार 5 कोटी )

निकोलास पुरन ( वेस्ट इंडिज)

IPL च्या मिनी लिलावात वेस्ट इंडिजचा निकोलास पुरन 16 कोटींचा भाव खाऊन गेला. मात्र, सात वर्षांपूर्वी हाच निकोलास स्वत:च्या पायावरही धड उभा राहू शकत नव्हता. 2015 ला एका अपघातात त्याच्या दोन्ही पायांना जबर इजा झाली होती. अनेक महिने तो व्हिलचेअरवरच होता.

ओशेन थाॅमस ( वेस्ट इंडिज)

वेस्ट इंडिजचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला ओशेने थाॅमस 2020 साली एका मोठ्या कार अपघातातून बचावला. त्याच्या कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता, पण सुदैवाने त्याला कमी दुखापत झाली.

अफसर झझाई ( अफगाणिस्तान)

अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक अफसर झझाईही 2020 साली कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पुनरागमनाविषयीही प्रश्नचिन्ह होते. मात्र, त्याने सर्व संकटांवर मात करत, पुन्हा संघात स्थान मिळवले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.