सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरुन नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमाॅर्टमवेळी कूपर रुग्णालयाचे कर्मचारी रुपकुमार शाह उपस्थित असल्याचा दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. शाह यांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचा दावा केला आहे. सुशांत सिंह प्रकरणाचे सत्य लवकरच बाहेर येईल, आता बेबी पेंग्विन दूर नाही, असा इशारा नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.
( हेही वाचा :.. तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार; माजी भाजप नेत्याचा दावा )
Join Our WhatsApp Community