नवं वर्षाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, १७ नायजेरियन नागरिकांना १ कोटींच्या ड्रग्जसह अटक

162
नवी मुंबई पोलिसांकडून नववर्षाच्या पूर्वसंध्येला खारघर येथे सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. थर्टीफर्स्टच्या पार्ट्यामध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या १७ नायजेरियन नागरिकांना १ कोटी १३ लाख रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये नायजेरियन महिलांचा मोठा समावेश असून, कारवाईच्या वेळी या महिलांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी बळाचा वापर करून या नायजेरियन नागरिकांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
अंमली पुरवठयाच्या बेकायदेशीर धंद्यात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांचा शिरकाव झालेला आहे. शिक्षणाच्या नावाखाली, तर कधी पर्यटकांच्या नावाखाली भारतात प्रवेश करणाऱ्या नायजेरियन नागरिक देशातील महत्वाच्या शहरात प्रस्तापित झालेले आहे. ऑनलाइन फसवणुकीसह अंमली पदार्थाच्या धंद्यात या नायजेरियन टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. नवी मुंबईतील खारघर, कामोठे, नेरुळ, पनवेल तसेच ठाण्यातील दिवा, मुंब्रा, भिवंडी, मिरारोड, काशीमीरा, नालासोपारा, विरार वसईमध्ये नायजेरियन टोळ्या मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. नवी मुंबईतील खारघर सेक्टर नंबर १२ या ठिकाणी असलेल्या रो-हाऊस या ठिकाणी नायजेरियन महिला पुरुष मोठ्या प्रमाणात चरस, हेरॉईन, गांजा आणि एमडीसारखे अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद आणि इतर अधिकारी अंमलदार, महिला अधिकारी आणि महिला अंमलदार यांचे मोठे पथक तयार करण्यात आले. ३१ डिसेंबर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाने खारघर सेक्टर १२ येथील रो हाऊस जवळ खात्री केली असता, रो हाऊसच्या काही नायजेरियन पुरुष महिला अंमली पदार्थ विक्री करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता नायजेरियन महिला आणि पुरुषांनी पोलिसांच्या या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा विरोध झिडकारून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या १७ नायजेरियन महिला पुरुषांना अटक करून १ कोटी १३ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. नवी मुंबई पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई असून, एकाच वेळी १७ नायजेरियन महिला- पुरुषांना अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.