वर्ष २०२२ हे जगासाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचे गेले, याला कारण कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्ध कारणीभूत आहे. आता २०२३ वर्षात काय स्थिती असणार, अशी चर्चा सुरु असतानाच जागतिक नाणेनिधी (आयएमएफ)ने काही तर्क मांडले आहेत. यात हे नवीन वर्ष चीनसाठी आर्थिकदृष्ट्या फार खडतर असणार, असे म्हटले आहे.
चीनची अर्थव्यवस्था कोलमडणार
एमआयएफ च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या की, जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग यंदा मंदीच्या सावटाखाली असणार आहे. अमेरिका, युरोपियन युनियन आणि चीनमधील मंदीमुळे 2023 हे वर्ष 2022 पेक्षा अधिक कठीण असेल. जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची 2023 ची सुरुवात कठीण होईल. त्याच्या झिरो -कोविड पॉलिसीमुळे 2022 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेची गती कमी झाली आहे. 40 वर्षांत पहिल्यांदाच 2022 मध्ये चीनची वाढ जागतिक अर्थव्यवस्थेच्या सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते, असेही त्या म्हणाल्या.
(हेही वाचा #BOYCOTTSonyTV ट्रेंड सुरु; ‘सोनी’च्या ‘क्राईम पेट्रोल’मध्ये आफताब बनला हिंदू, श्रद्धा बनली ख्रिश्चन)
पुढील काही महिने चीनसाठी कठीण जाणार असून चीनच्या विकासावर त्याचा परिणाम नकारात्मक होईल. चीन सध्या कोरोनाच्या गंभीर लाटेचा सामना करत आहे. चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चीनमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे, त्याचा देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. रुग्णालये खचाखच भरली असून अनेकांना बेड्सदेखील मिळत नाही. चीन सध्या दोन्ही स्तरावर संकटाचा सामना करत आहे.
Join Our WhatsApp Community