प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करण्याच्या तयारीत असताना, ठाकरेंना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांची भेट घेऊन त्यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे शिंदे-कवाडे गटाच्या युतीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जवळपास १ तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. याआधी शिंदे गटाने दलित पँथरसोबत युतीचे संकेत दिले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा उद्धव सेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
एक तास झाली चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. त्यांनतर, शिंदेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कवाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे एकेकाळी मविआत असलेले कवाडे आता शिंदे-फडणवीस यांच्यासोबत दिसणार का, अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जोगेंद्र कवाडे हे मविआवर नाराज होते. मविआ सरकार मित्रपक्षांना विसरले असा आरोपही त्यांनी केला होता.
Join Our WhatsApp Community