औरंगजेब हा हिंदूद्वेष्टा किंवा क्रूर नव्हता, असे गुणगान गाणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. तसे निर्देश पोलीस दलाला देण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की, स्वराज्य रक्षक?, या वादावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड यांनी ‘औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता, असे वक्तव्य केले. त्यानंतर या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. मंत्री गिरीश महाजन यांनी आव्हाड यांचा व्हिडीओ ट्विट करत औरंगजेबाच्या प्रेमाखातर आणखी कोणत्या थराला जाणार आहात, असा सवाल उपस्थित केला आहे. महाजन यांच्यासह राज्यभरातील अनेक नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.
( हेही वाचा: ‘काॅंग्रेस- राष्ट्रवादी शिवसेनेला टकमक टोकाकडे घेऊन जात आहेत’, ट्वीट करत शेलारांचा ‘मविआ’वर निशाणा )
आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात शिव-शंभूप्रेमींच्या भावना तीव्र आहेत. ही बाब लक्षात घेऊन, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांना सध्या वाय+ दर्जाची सुरक्षा आहे. त्यात आणखी काही सुरक्षा रक्षकांची वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या दौऱ्यावेळी जास्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची सूचना गृह विभागाने केली आहे.
Join Our WhatsApp Community