उर्फी जावेद वाद; चित्रा वाघ म्हणाल्या, राजकारण नको, हा विषय सामाजिक!

173

अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या अश्लील पेहरावामुळे भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका केली. त्याला उर्फीने प्रत्युत्तर देत त्यांच्यावर पलटवार केला. यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेत उर्फीचे समर्थन केले. त्यापाठोपाठ महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही उर्फीचे समर्थन केले आहे. असा प्रकारे या विषयाला राजकीय रंग आला आहे. अशा वेळी वाघ यांनी हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही, तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे, ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का? असा प्रश्न विचारला आहे. यासंबंधी ५ ट्विट करत वाघ यांनी त्यांची पुन्हा भूमिका मांडली आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ? 

आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचे कारण नाही, पण जिथे आपण समाजात वावरतो, सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणे हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये? व्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं, हा ही धर्म नाही का? लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का? स्री शिक्षित व्हाही, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अश्या लेकी अभिप्रेत होत्या का? जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का? माझं आवाहन आहे की, हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊ या. छत्रपतींचा आदर्श, सावित्रीचे संस्कार जपू या. खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा जागर करू या. हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे,ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का? व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच, समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे.

(हेही वाचा २०२३ वर्षात मोदी सरकारसमोर ५ कायदे बनवण्याचे असणार आव्हान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.