मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांची आघाडी झाल्याची घोषणा बुधवार, ४ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
काय म्हणाले प्रा. कवाडे?
आधीपासून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत जाण्याचा विचार करत होतो. खूप धाडसी निर्णय शिंदे यांनी घेतला. धाडसी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. राज्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना आश्वस्त करणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहेत. काही जण बाप लीडर असतात एकनाथ शिंदे हे तळागळातून आले आहेत. त्यांच्यावर प्रभावित होऊन पीपल्स रिपब्लिकन पक्षाने शिंदे गटासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला, असे प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाच्या आघाडीची घोषणा करत आहोत. शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधनकार यांचे विचार आमच्या आघाडीची धारणा असणार आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती झाली, तेव्हा मुख्यमंत्री त्यांच्या गावाला जाऊन आले आणि तिथे पुण्यातील भिडे वाड्याचा पुनर्विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. आमच्या आघाडीची राज्यात सभा होणार आहेत, अशी घोषणा प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.
(हेही वाचा शरद पवारांनी अजित पवारांना सुनावले; म्हणाले…)
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
जेव्हा सरकार बदलले तेव्हापासून त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे सरकार सर्व सामान्यांचे सरकार दिसते, असे सांगत राहिले. कवाडे यांचा पक्ष आणि आमचा पक्ष संघर्षातून पुढे आला आहे. प्रा. कवाडे आक्रमक नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आंदोलनाने त्यांनी प्रस्थापितांना हादरवून टाकले होते. त्यांना ६ महिने तुरुंगात ठेवले होते, २० जिल्ह्यांमध्ये भाषण बंदी केली होती. शोषित, पीडित समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी ओबीसींच्या प्रश्नावर दिल्लीतही आंदोलन केले, त्यावेळी तिहार जेलमध्येही त्यांना ठेवले होते, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community