गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या सर्व मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी भाजप बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके, सरचिटणीस गजानन नागे, उपाध्यक्ष बबनराव बारगजे, आनंद जरग, राजकुमार घार्गे, अनिल यादव, संतोष काटकर, सूर्यकांत अण्णा हेगिष्टे, श्रीकांत गंलाडे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्यासोबत बैठक घेतली. यादरम्यान खालील विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले आहेत…
( हेही वाचा : गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळेंच्या खांद्यावर मुंबईची धुरा; …असा आहे शिंदे गटाचा मास्टर प्लॅन)
या विषयांवर चर्चा करत निर्णय
- सदस्य नोंदणी कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे.
- १ जानेवारीपासून सुरू होणारे कर्मचारी रोटेशन फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार आहे.
- रोटेशन लावताना कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार कामाचे वाटप नियमाने होणार आहे.
- निरीक्षक कामगार वर्गांना त्यांच्या पदानुसार करारामध्ये दिलेल्या ग्रेडेशननुसार त्यांना निरीक्षक पदाचे वेतन लवकरात लवकर देण्यात यावे यावर चर्चाकरून लवकरच निर्णय होईल.
- निवृत्त झालेल्या कामगारांना त्यांचे देणे असलेली थकीत रक्कम लवकरात लवकर अदा करण्यात येईल.
- सन २०१६ ते २०२१ या कराराचे एरियस लवकरात लवकर कामगारांना देण्यात येईल त्याबाबत मुंबई आयुक्त यांना बजेट दिले आहे याविषयी या बैठकीत चर्चा झाली.
- अभिसंख्यात कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय लवकरच दूर होईल तसेच सेवा ज्येष्ठतेनुसारच कामाचे वाटप करण्यात येईल.
- ज्या मेडिकल अनफिट कामगारांना नोटीस देण्यात आल्या आहेत त्या रद्द करण्यात येत असून, त्यांना VRS चा पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. अशा कामगारांनी आणिक आगाराच्या अनिल यादव यांच्यासोबत संपर्क साधवा असे भाजप बेस्ट कामगार संघ तर्फे जाहीर करण्यात आले आहे.