राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात विषबाधा; 700 जणांची प्रकृती बिघडली

183

औरंगाबादमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा झाली आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 700 जणांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा बुधवारी लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा: हिंदूंचे हत्याकांड घडवणाऱ्या आयएसआयच्या दोन दहशतवाद्यांचा पाकिस्तानातच खात्मा! )

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेर यांचा विवाहसोहळा बुधवारी औरंगाबादमध्ये पार पडला. यावेळी मुलीकडच्या लोकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी केली होती. मात्र, याचवेळी लग्नात मुलीकडच्या लोकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी केली होती. मात्र, लग्नात बनवण्यात आलेल्या स्वयंपाकातून लोकांना विषबाधा झाली. पाहता- पाहता अनेकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 700 जणांना विषबाधा झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.