मुंबईकरांना २४ तास सेवा देणारे ‘बिग बॉस’; इन्स्टाग्रामवर व्हिडिओ होतोय व्हायरल

141

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. इन्स्टाग्राम रिल्सला तरुणाईची पसंती मिळत असून, सध्या इन्स्टावर बिग बॉस ऑडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक आपली दिनचर्या या बिग बॉस ऑडिओच्या माध्यमातून शेअर करत आहेत. सकाळी ८ पासून रात्री झोपेपर्यंत आपण काय-काय करतो, दिवसभर कोणकोणते पदार्थ खातो असे अनेक व्हिडिओ या ऑडिओद्वारे युजर्सनी बनवले आहेत. परंतु आता मुंबई वाहतूक पोलिसांनी शेअर केलेला बिग बॉस व्हर्जन व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

( हेही वाचा : मुंबई-गोवा ‘शिवशाही’ कायस्वरुपी धावणार; किती असेल तिकीट? )

बिग बॉसच्या घरात ‘सुबह ८ बजे’ अशी घोषणा केल्यावर सर्व स्पर्धकांचा दिवस सुरू होतो. अगदी त्याचप्रमाणे मुंबई वाहतूक पोलीस सुद्धा सकाळी कामावर हजर होतात. मात्र फरक एवढाच बिग बॉसच्या घराचे दिवे १० नंतर बंद होतात पण मुंबई वाहतूक पोलीस २४ तास मुंबईकरांच्या सेवेत रुजू असतात. सकाळ असो किंवा रात्र त्यांना कायम मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे लागते. गणपती उत्सव, दिवाळी अशा सण-उत्सवासाठी पोलिसांना कधीही सुट्ट्या मिळत नाहीत. यादरम्यान जास्तीत जास्त लोक घराबाहेर पडत असल्याने त्यांना रात्रंदिवस कामावर हजर रहावे लागते. वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियम मोडल्यावर दंड आकारतात अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक गरजू व्यक्तीची मदतही करतात असा संदेश या व्हिडिओच्या माध्यामातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांच्या इन्स्टाग्राम पेजवर त्यांच्या सन्मानार्थ ‘वाहतूक नियंत्रणाचे बिग बॉस’ असे हे रिल्स शेअर करण्यात आले आहे.

वाहतूक नियंत्रणाचे ‘बिग बॉस’

मुंबई वाहतूक पोलिसांनी शेअर केलेल्या या रिल्सला अवघ्या ४ तासांत २२ हजार ७०० लाईक्स तर जवळपास दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सनी यावर कमेंट करत वाहतूक पोलिसांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच रात्रंदिवस मुंबईकरांना देत असलेल्या सेवेबद्दल मुंबईकरांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.