मुंबई महापालिकेचा आगामी अर्थसंकल्प येत्या ३ फेब्रुवारीला‌?

173

मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असून लोकप्रतिनिधी नसल्याने सन २०२३-२४चा अर्थसंकल्प हा केवळ प्रशासनाच्यास्तरावर मांडून मंजूर केला जाणार आहे. महापालिका आयुक्तच प्रशासक असल्याने येत्या ३ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडून त्याला मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : आता देशभरात हवाईमार्गाने प्रत्यारोपणासाठी अवयव पोहोचवणे होणार अधिक सोपे)

मुंबई महापालिकेत तब्बल ३६ वर्षांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासकाची नेमणूक केली गेली आहे. एप्रिल १९८४ मध्ये द.म.सुखटणकर यांची पहिले प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तर पुढे १२ नोव्हेंबर १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीत जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेचे १९८५ मध्ये शिवसेनेची पहिली सत्ता आली होती. परंतु या दोन वर्षांमध्ये महापालिकेचा अंदाजपत्रक प्रशासकांनी मंजूर केले होते. त्यानंतर १९८५ ते ९० या कालावधी महापालिकेची मुदत संपल्यानंतरही प्रत्येकी सहा महिन्यांप्रमाणे मुदतवाढ देत १९९२पर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे या कालावधीमध्ये स्थायी समिती अध्यक्षांना सादर करण्यात आला होता.

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आल्याने एरव्ही निवडणुकीच्या वर्षात आचारसंहितेमुळे आयुक्त अर्थसंकल्प सादर करून तो तिजोरीत ठेवतात आणि नवीन महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सहा महिन्यांच्या सुधारीत अर्थसंकल्पाला मंजुरी देतात. परंतु यंदा निवडणूक लांबणीवर पडल्याने आगामी २०२२-२३चा अर्थसंकल्प हा आयुक्त तथा प्रशासक असलेले इक्बालसिंह चहल हेच मांडणार आणि तेच मंजूर करणार आहेत. महापालिकेचा अर्थसंकल्प ५ फेब्रुवारीपूर्वी सादर करणे बंधनकारक असल्याने शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला जाण्याची शक्यता आह. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासक असल्याने तो कधी मांडला जावा आणि कशाप्रकारे सादर केला जावा याबाबतचा विचार केला जात आहे. त्यामुळे यंदा आयुक्तांना अर्थसंकल्पीय भाषण करण्याची वेळ येणार नसून अर्थसंकल्पीय पुस्तिका प्रसारमाध्यमांना वितरीत करून पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार असल्याचे समजते. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल हे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, अश्विनी भिडे,पी वेलरासू, डॉ संजीव कुमार, सहआयुक्त अजित कुंभार, रमेश पवार, चंद्रशेखर चौरे यांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.