यवतमाळ येथील श्री वसतंराव नाईक येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात गुरुवारी रात्री रुग्णाने निवासी डॉक्टरावर हल्ला केल्याचे पडसाद आता देशभरात उमटले आहेत. आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यास ऑल इंडिया मेडिकल स्टुडट्स असोसिएशनकडून संप पुकारला जाईल, असा इशारा अध्यक्ष जितेंद्र सिंग यांनी दिला. हल्ल्यातील आरोपी सूरज ठाकूरला (३६)पोलिसांनी रात्रीच अटक केली. घटनेविरोधी संताप व्यक्त करण्यासाठी यवतमाळ येथील निवासी डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा बंद केली आहे.
( हेही वाचा: धक्कादायक: 200 दशलक्ष ट्वीटर युजर्सचा डेटा चोरीला; ईमेल आयडी लीक )
नेमकी घटना काय?
४ जानेवारी रोजी सरकारी रुग्णालयातील सूरज ठाकूर या रुग्णाला दाखल करण्यात आले. सूरज यांच्या पोटावर जखमा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुस-या दिवशी जेबेस्टीन एडविन यांची रुग्ण दाखल असलेल्या विभागात रुग्ण तपासणी सुरु होती. त्याचवेळी सूरज यांनी जेबेस्टीन यांच्या मानेवर चाकूने हल्ला केला. या हल्लयात जेबेस्टीन यांच्या पाठीवरही जखमा झाल्या. हल्ल्यात अजून एक डॉक्टर जखमी झाला. जेबेस्टीन यांना गंभीर जखमा झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. जेबेस्टीन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती यवतमाळ येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयाचे मार्डचे अध्यक्ष डॉक्टर सागर डोळे यांनी दिली. घटनेच्या निषेधार्थ मार्डने रुग्णालयातील अत्यावश्यक सेवेतूनही माघार घेतली आहे. आरोपीवर कडक कारवाई करा, या मागणीसाठी यवतमाळ येथील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे.
ऑल इंडिया असोसिएशनची केंद्र सरकारकडे मागणी
- देशभरात सरकारी रुग्णालयात डॉक्टरांवर होणा-या हल्ल्याचा तपशील ठेवा. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी संबंधित माहिती कामी येईल.
- सरकारी रुग्णालयात रुग्णासोबत येणा-या नातेवाईकांची संख्या मर्यादित असावी.