संजय राऊत नाशिकात पोहोचण्याआधीच ५० शिवसैनिकांचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’!

172
दररोज सकाळी उठून शिंदे गटावर आगपाखड करणाऱ्या संजय राऊत यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेने दणका दिला आहे. पक्षबांधणीसाठी राऊत नाशिकात पोहोचण्याआधीच तेथील महत्त्वाच्या ५० पदाधिकाऱ्यांना आपलेसे करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवरील आपली पकड दाखवून दिली आहे.
नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर या बालेकिल्ल्याची पडझड सुरू झाली. येथील बहुतांश आमदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहेत.
मात्र, राऊत नाशिकात पोहोचण्याआधीच ५० महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना आपलेसे करीत शिंदे गटाने उद्धवसेनेला धक्का दिला आहे. यात विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, यांसह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवनात हा पक्षप्रवेश पार पडला.
या आधीही राऊतांची पाठ फिरताच नाशिकमधील १२ माजी नगरसेविकांसह राऊतांच्या विश्वासू शिलेदाराने शिंदे गटात प्रवेश केला होता.

‘या’ पदाधिकाऱ्यांचा प्रवेश 

योगेश बेलदार, अनिल साळुंखे, बापू लहुजी ताकटे, शिवा ताकाटे, अमोल सूर्यवंशी, योगेश चव्हाणके, प्रमोद लासुरे, रुपेश पालकर, संदेश लवटे, नाना काळे, उमेश चव्हाण, प्रमोद जाधव, संदीप डहाके, विनोद मुंगसे, शैलेश कारले, प्रसाद तांबट, प्रशांत आव्हाड, महेश जोशी, राहुल देशमुख, प्रशांत गाडगे, प्रशांत निकम, स्वप्नील गायकवाड, अजय निकम, राजेश गीते, महेश लोखंडे, अमित कटक, प्रमोद कालेकर, योगेश धामणकर, गोकुळ मते, विलास खैरनार, बाळू बोबरे, दर्शन काळे, राकेश मोरे, मोहित वराडे, अमित गांगुर्डे, समीर कांबळे, गणेश परदेशी, राहुल रंधरे, अमोल बराटे, अनिल निर्भवणे, प्रशांत निचळ, तकदीर कडवे, विशाल आहेर, आनंद भटकळ, उमेश गोणार, धीरज कडाळे, अमेय जाधव, गणपत मेनू, लक्ष्मण पाटील, मनोज उदावंत, अनिल नागरे, संदीप कदम, रवींद्र पेहरकर, पंकज भालेराव, अनिल शिंदे, संजय गवळी, योगेश सावकार, अभिजीत तागड.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.