‘तो दिल्लीतील गाढव मुलगा काहीतरी बरळतो’, शरद पोंक्षे यांची राहूल गांधींवर अप्रत्यक्ष टीका

172

स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव दर दोन- तीन महिन्यांनी आपल्याला न्यूज किंवा इतर माध्यमांतून ऐकायला येते. दिल्लीतील अतिशय गाढव आणि मुर्ख मुलगा काहीतरी बरळत असतो. पण मी त्याचा आभारी आहे, कारण हिंदू समाज हा अतिशय थंड समाज आहे. आपल्याला फार वेळ लागतो आणि एकदा का वाद पेटले, की मग आपण कोणाला ऐकत नाही, अशी प्रखर टीका अभिनेते शरद पोंक्षे यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे केली आहे. मनसेतर्फे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ‘जयोस्तुते’ या व्याख्यानमालेत उपस्थितांना संबोधित करताना शरद पोंक्षे यांनी सावरकरांवर टीका करणा-यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील जयोस्तुते या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ठाण्यातील मनसेकडून प्रमुख वक्ते म्हणून अभिनेते शरद पोंक्षे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शरद पोंक्षे यांनी सावरकरांवर टीका करणा-या विरोधकांवर सडकून टीका केली.

अहिंसेच्या अतिरेकामुळे ही परिस्थिती ओढावली

भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पोंक्षे यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र डागले. दिल्लीतील एक मूर्ख मुलगा काहीतरी बरळत असतो, त्यानंतर आपण जागे होतो. त्यामुळे त्या वेड्या मुलाचे मी आभार मानतो, अशी उपहासात्मक टीका शरद पोंक्षे यांनी केली आहे. पुढे भाषणात बोलताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मवीर बोलण्यावरुन निर्माण झालेल्या वादावर टिपणी करत अहिंसेच्या अतिरेकामुळे ही परिस्थिती ओढावली असल्याचे मत मांडले आहे.

( हेही वाचा: संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी; पुढील सुनावणी 24 जानेवारीला )

महापुरुषांबद्दल बोलण्याची आपली लायकी आहे का?

शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, मी सावरकरांचे विचार पोहचवत आहे. महापुरुषांबद्दल कोणी अवाक्षर काढू नये, अशी सामान्य माणसांची दहशत व्हायला हवी आणि निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकांनी ही दहशत दाखवून द्यायला हवी, महापुरुषांचा अपमान कोणी करता कामा नये. त्यांच्या काळात ती माणसे मोठी होती, त्यांच्याबद्दल बोलायची आपली लायकी आहे का? असा सवाल पोंक्षे यांनी उपस्थित केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.