मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवस विशेष पॉवर ब्लॉक! लोकल गाड्यांवर होणार परिणाम

164

मध्य रेल्वे मार्गावर 7 आणि 8 जानेवारी 2023 रोजी (शनि/रवि मध्यरात्री) नाहूर आणि मुलुंड दरम्यान गर्डरच्या पहिल्या टप्प्यासाठी विशेष रात्रीचा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा पॉवर ब्लॉक 7 आणि 8 जानेवारी 2023 (शनि/रवि मध्यरात्री) 01.20 ते 04.20 पर्यंत 5व्या आणि 6व्या मार्गावर आणि 01.20 ते 05.15 पर्यंत विक्रोळी आणि मुलुंड दरम्यान जलद आणि धीम्या मार्गावर असणार आहे.

( हेही वाचा : धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! ‘या’ गाड्या विलंबाने, प्रवाशांची गैरसोय)

उपनगरीय गाड्यांच्या चालण्यावर होणारा परिणाम

  • ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या उपलब्ध नसतील.
  • ब्लॉकपूर्वी कल्याणकडे जाणारी शेवटची लोकल: S1 कर्जत लोकल सीएसएमटीहून 00.24 वाजता सुटेल
  • ब्लॉकनंतर कल्याणकडे जाणारी पहिली लोकल: S3 कर्जत लोकल सीएसएमटीवरून 04.47 वाजता सुटेल.
  • कल्याणहून ब्लॉकनंतर सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल: TL-4 CSMT लोकल कल्याणहून 04.48 वाजता सुटेल.

मेल एक्सप्रेसवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे असतील…

  • ट्रेन क्रमांक-11020 कोणार्क एक्स्प्रेस ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेशन होईल.
  • ट्रेन क्रमांक-12810 हावडा-मुंबई सीएसएमटी मेल दादर येथे शॉर्ट टर्मिनेशन होईल.

खालील गाड्या निर्धारित वेळेच्या 40 ते 65 मिनिटे उशिरा पोहोचतील…

  • ट्रेन क्रमांक-18030 शालीमार एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक-18519 विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक-12134 मंगलोर-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक-20104 गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक-12702 हैदराबाद-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.